Big Boss Marathi 5: "आपले ते आपलेच" घरच्यांशी एक संवाद अन्, वर्षा उसगांवकर ते सूरज या सगळ्यांनाच फुटला आठवणींचा पाझर

Big Boss Marathi 5: "आपले ते आपलेच" घरच्यांशी एक संवाद अन्, वर्षा उसगांवकर ते सूरज या सगळ्यांनाच फुटला आठवणींचा पाझर

नुकतेच बिग बॉसने घरातील स्पर्धकांचे घरच्यांशी एक संवाद साधून दिले आहे. यादरम्यान प्रत्येक स्पर्धकांचा कंठ भरून आलेला दिसला घरातील प्रत्येकजण हा भावूक होता दिसला.
Published by :
Team Lokshahi
Published on

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची एक आगळी वेगळी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. बिग बॉसचे ही वेगळे खेळ पाहुन स्पर्धकांची ही तारांबळ उडताना दिसत आहे. कधी निक्की आणि वर्षा उसगांवकर या दोघींमधले खटके तर कधी, सुरजची घराला घरपण देणारी आपुलकीची माया, कधी जान्हवीचा उद्धटपणा तर कधी, अरबाजची अरेरावी आणि या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का आतापर्यंत बिग बॉसच्या घरात दोनदा भाऊचा धक्का पार पडला आहे. तर या पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुखने पहिला निक्की आणि आता जान्हवी असं दोघींच्या ही उद्धटपणाची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. तर यादरम्यान आतापर्यंत झालेल्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुखचा एक अनावर झालेला राग आपण सगळ्यानींच पाहिला. या सदस्यांना बिग बॉसच्या घरात तीन आठवडे झाले यादरम्यान प्रत्येकजण बिग बॉसच्या टिकून राहण्यासाठी आपल्या ताकदीचे प्रदर्शन करून खेळ खेळत आहे.

नुकतेच बिग बॉसने घरातील स्पर्धकांचे घरच्यांशी एक संवाद साधून दिले आहे. यादरम्यान प्रत्येक स्पर्धकांचा कंठ भरून आलेला दिसला घरातील प्रत्येकजण हा भावूक होता दिसला. खेळात भावनाशुन्य होणारे हे स्पर्धक घरच्यांशी बोलताना मात्र अश्रूंचा महापूरात रडताना दिसले. यांचे एकमेकांसोबत जरी शत्रूता पाहायला मिळाली असली तरी यावेळेस मात्र घरातला प्रत्येक सदस्य हा आपुलकीने प्रत्येकला समजून घेत होता. तीन आठवडे कुटुंबीयांपासून दूर राहून अचानक कुटुंबीयांसोबत संवाद साधून प्रत्येकजण भावूक झाला होता. संवाद साधताना वर्षा उसगांवकर ते सूरज हे सगळेच स्पर्धक ढसाढसा रडताना दिसले.

यादरम्यान 'बिग बॉस' म्हणाले, "सदस्यांनी साधला जिवलगांसोबत आपुलकीचा संवाद." 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग पाहताना 'बिग बॉस'प्रेमींनादेखील अश्रू अनावर होणार आहेत. तसेच वर्षा उसगांवकर संवाद साधत असताना म्हणाल्या, "आज मला तुझी खूप आठवण येते बाबा" आणि हे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर दुसरीकडे अंकिताच्या ही "तुझ्यासोबत शेवटचं बोलणं राहिल" हे बोलताना अश्रूंचा बांध फुटला. नेहमी एकमेकांसोबत आवाज चढवून बोलणारे स्पर्धक या भागात मात्र आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना भावूक होऊन व्यक्त करताना दिसले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com